अ‍ॅपशहर

​‘एम्स’ हॉस्पिटलचे उद्‍घाटन

‘विविध आजारांचा वाढता वैद्यकीय खर्च रुग्णांना परवडत नाही. सरकारची राजीव गांधी जीवनदायी योजना असल्याने त्याचा उपयोग गरीबांना होतो, तरीही अत्याधुनिक यंत्रणांसह वैद्यकीय सेवा देणारांनीही सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून गरीबांना सवलतीत वैद्यकीय उपचार सुविधा देण्याची गरज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी येथे व्यक्त केली.

Maharashtra Times 8 Nov 2016, 3:00 am
नगर ः ‘विविध आजारांचा वाढता वैद्यकीय खर्च रुग्णांना परवडत नाही. सरकारची राजीव गांधी जीवनदायी योजना असल्याने त्याचा उपयोग गरीबांना होतो, तरीही अत्याधुनिक यंत्रणांसह वैद्यकीय सेवा देणारांनीही सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून गरीबांना सवलतीत वैद्यकीय उपचार सुविधा देण्याची गरज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन व विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी येथे व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ames hospital inaugurat
​‘एम्स’ हॉस्पिटलचे उद्‍घाटन

येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश शेळके व विक्रांत चांदवडकर यांच्या साईसुजाता हॉस्पिटल्स कंपनीद्वारे नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कोठला बसस्थानकाजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या ‘एम्स’ रुग्णालयाचे उदघाटन महाजन व विखे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना दोघांनीही ‘एम्स’मधील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे वैद्यकीय उपचार सुविधेचे कौतुक केले. येथील अशा सुविधांमुळे नगरचा लौकिक वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी आमदार अरुण जगताप, नाशिकचे आमदार राहुल आहेर, महापौर सुरेखा कदम, आमदार मोनिका राजळे, डॉ. सुजय विखे, माजी आमदार दादा कळमकर, सीए गिरीश घैसास, शहर बँकेचे अध्यक्ष डॉ. विजय भंडारी, लक्ष्मण सावजी, डॉ. बाळासाहेब बांडे, डॉ. सुदाम जरे आदींसह अन्य उपस्थित होते. डॉ. शेळके यांनी प्रास्ताविकात ‘एम्स’मधील वैद्यकीय सुविधांची माहिती दिली. चांदवडकर यांनी स्वागत केले. डॉ. राकेश गांधी यांनी आभार मानले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज