अ‍ॅपशहर

केजरीवाल यांना सत्तेची नशा चढलीः अण्णा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढली असून मी दिलेली शिकवण ते विसरले आहेत, अशी चपराक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लगावली आहे. शुंगलू समितीनं केजरीवाल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानंतर अण्णांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

Maharashtra Times 7 Apr 2017, 4:11 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anna hazare slams arvind kejriwal
केजरीवाल यांना सत्तेची नशा चढलीः अण्णा


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढली असून मी दिलेली शिकवण ते विसरले आहेत, अशी चपराक ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लगावली आहे. शुंगलू समितीनं केजरीवाल यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानंतर अण्णांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या शिकलेल्या तरुणांमुळे देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असं स्वप्न मी पाहिलं होतं. पण ते आता भंगलं आहे, अशी खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. शुंगलू समितीने केजरीवाल यांच्यावर जे आरोप केले, ते ऐकून खूप दुःख झालं. कारण, आंदोलनाच्या काळात केजरीवाल माझ्यासोबत होते. त्यावेळी मी त्यांना चारित्र्यवान बनण्यासाठी पंचसूत्री सांगितली होती. माझे जीवन पाहून केजरीवाल प्रभावित झाले होते. मात्र, सत्तेच्या खुर्चीने त्यांना ही शिकवण विसरायला लावली आहे, असं त्यांनी फटकारलं.

आपला देश कायद्यांनुसार चालतो हे माहीत असूनही केजरीवाल यांनी दिल्ली सरकारमध्ये बेकायदेशीर गोष्टी केल्या. त्या निश्चितच निंदनीय आहेत, असं अण्णांनी सुनावलं. केजरीवाल यांनी राजकीय पक्ष काढला. ते मुख्यमंत्री झाले. तरीही त्यांना भेटण्याची मला इच्छा झाली नाही, अशा माणसापासून दूर ठेवल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो, असा टोलाही त्यांनी हाणला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज