अ‍ॅपशहर

खेर, जोशी, वल्लाकट्टी यांना ‘अनुनाद गौरव’ पुरस्कार

सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुनाद फौंडेशनचे या वर्षीचे ‘अनुनाद गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Maharashtra Times 21 Jun 2016, 3:01 am
नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम anunad awards
खेर, जोशी, वल्लाकट्टी यांना ‘अनुनाद गौरव’ पुरस्कार


सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुनाद फौंडेशनचे या वर्षीचे ‘अनुनाद गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. पत्रकारितेतील योगदानाबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'चे ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते प्रा. मकरंद खेर व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल अंजली देवकर-वल्लाकट्टी यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.

येत्या रविवारी (२६ जून) सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या माऊली सभागृहात अनुनाद गौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम अनुनादच्या वार्षिक सभासदांसाठीच आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज