अ‍ॅपशहर

सुविधांसाठी मोफत सल्ला

महापालिकेद्वारे राबविल्या जात असलेल्या घरकुल योजनांसह अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व अन्य योजना तसेच वाहतूक नियंत्रण, प्रदूषणमुक्ती व अन्य सार्वजनिक हिताच्या योजनांसाठी महापालिकेला मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय शहरातील आर्किटेक्ट मंडळींनी घेतला.

Maharashtra Times 21 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम architect to give free advice to municipal
सुविधांसाठी मोफत सल्ला


महापालिकेद्वारे राबविल्या जात असलेल्या घरकुल योजनांसह अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व अन्य योजना तसेच वाहतूक नियंत्रण, प्रदूषणमुक्ती व अन्य सार्वजनिक हिताच्या योजनांसाठी महापालिकेला मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्णय शहरातील आर्किटेक्ट मंडळींनी घेतला आहे. नगर शहराचा सुनियोजित विकास होण्यासाठी आर्किटेक्टकडून पुढाकार घेतला जाणार असून, महापालिकेने त्याला प्रतिसाद देण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए) या मातृसंस्थेची नगरला शाखा स्थापन झाली असून, तिचा पदग्रहण समारंभ शनिवारी (२२ जुलै) सायंकाळी ६ वाजता नगर-मनमाड रोडवरील हॉटेल संजोगमध्ये होणार आहे. ‘आयआयए’ संस्थेचे माजी अध्यक्ष व कौन्सिल ऑफ आर्किटेक्ट संस्थेचे सदस्य प्रकाश देशमुख, माजी उपाध्यक्ष विलास अवचट व विद्यमान सचिव सी. आर. राजू यांच्या उपस्थितीत नगर शाखेचे अध्यक्ष आर्किटेक्ट अशोक काळे, सचिव स्वप्नील साठे व अन्य सदस्यांना शपथ दिली जाणार आहे. या वेळी ‘आयआयए’च्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष सतीश माने, आर्किटेक्ट-इंजिनीअर्स-सर्व्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश परदेशी, लार्सन अँड टुब्रो कंपनीचे सहायक सरव्यवस्थापक अरविंद पारगावकर, नगररचनाकार संतोष धोंगडे आदी उपस्थित राहणार आहेत. नगरच्या या नव्या शाखेच्या कार्यकारिणीत मनोज जाधव, अर्शद शेख, प्रवीण आरू, दत्तात्रय शेळके, प्रल्हाद जोशी, वैभव देशमुख, नंदकिशोर घोडके, प्रितम मुथा, संजयकुमार पटवा, अरुण गावडे, रूपाली हारदे, सोनाली शेळके, तृप्ती भळगट, संतोष गायकवाड, सुशील जांगीड, तेजस दारोकर आदींचा समावेश आहे.

चौकट ः

‘ब्ल्यु प्रिंट’ देणार

नगर शहरातील वाहतूक समस्या, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, प्रदूषण, उड्डाण पुल आदींसह १० सार्वजनिक प्रश्नांवर उपाययोजना सुचविण्यासाठी आर्किटेक्टच्या नगर शाखेद्वारे येत्या दिवाळीपर्यंत ‘ब्ल्यू प्रिंट’ केली जाणार असून, ती महापालिकेसह सर्व संबंधित यंत्रणांना दिली जाणार आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावाही केला जाणार आहे. तसेच मनपाद्वारे सार्वजनिक सुविधांसाठी केल्या जाणाऱ्या विविध कामांमध्ये काही दोष दिसले तर त्यावर आक्षेपही घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज