अ‍ॅपशहर

कोपर्डीप्रकरणातील आरोपींवर हल्ला

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींवर आज न्यायालयाबाहेरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी या आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने हे तिन्ही आरोपी न्यायालयाच्या इमारतीमध्ये लपण्यासाठी पळाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली पण प्रसंगावधान राखत त्यांनी आरोपींची धरपकड करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. अचानक झालेल्या प्रकारामुळे न्यायालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Maharashtra Times 1 Apr 2017, 5:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम attack on kopardi accused in ahmednagar
कोपर्डीप्रकरणातील आरोपींवर हल्ला

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील तीन आरोपींवर आज न्यायालयाबाहेरच हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी या आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने हे तिन्ही आरोपी न्यायालयाच्या इमारतीमध्ये लपण्यासाठी पळाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली पण प्रसंगावधान राखत त्यांनी आरोपींची धरपकड करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. अचानक झालेल्या प्रकारामुळे न्यायालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

नगरमध्ये कोपर्डी प्रकरणाची आज सुनावणी होती. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना पोलीस घेऊन जात होते. हे तिन्ही आरोपी न्यायालयाच्या इमारतीसमोर येताच पार्किंगमधून चार हल्लेखोर त्यांच्या दिशेने धावतच आले आणि त्यांनी या आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेले हे तिन्ही आरोपी न्यायालयाच्या इमारतीमध्ये पळाले. तर पोलिसांनीही प्रसंगावधान राखत या चारही हल्लेखोरांना जागीच जेरबंद केले. शिवबा संघटनेनं हा हल्ला केला असून राजेंद्र पाटील, बाबूराव वाळेकर, अमोल खुणे आणि गणेश खुणे अशी या हल्लेखोरांची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान कोपर्डी अत्याचार प्रकरणी नवनाथ पाखरे यांची साक्ष पूर्ण झाली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी १७ एप्रिल रोजी होणार आहे.

उज्जवल निकम यांच्याकडून निषेध

दरम्यान, सरकारी वकील अॅड. उज्जवल निकम यांनी या घटनेचा तिव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे. जनमाणसात सनसनाटी निर्माण करण्यासाठीच हल्लेखोरांनी हा हल्ला केला असावा, अशी प्रतिक्रिया निकम यांनी यावेळी व्यक्त केली. या हल्ल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी निकम यांची भेट घेतली. या दोघांमध्ये यावेळी ४५ मिनिटे चर्चा झाली. आरोपींच्या वकिलांना पूर्ण सुरक्षा देण्यासोबतच खटल्याच्या वेळी बंदोबस्त वाढवण्याचे आश्वासनही पोलिसांनी यावेळी दिले.

खटला राज्याबाहेर चालवा

दरम्यान आरोपींचे वकील बाळासाहेब खोपडे यांनीही या घटनेचा निषेध नोंदवत आरोपींच्या वकिलांना संरक्षण देण्याची मागणी केली. हा खटला राज्याबाहेर चालविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मागणी करणार असल्याचेही खोपडे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज