अ‍ॅपशहर

ज्ञानविज्ञान पुरस्काराचे येत्या रविवारी वितरण

सावेडीच्या ज्येष्ठ नागरिक मंचाच्या ज्ञान विज्ञान पुरस्काराचे वितरण येत्या रविवारी सायंकाळी ५ वाजता सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात होणार आहे.

Maharashtra Times 1 Apr 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम award function
ज्ञानविज्ञान पुरस्काराचे येत्या रविवारी वितरण


सावेडीच्या ज्येष्ठ नागरिक मंचाच्या ज्ञान विज्ञान पुरस्काराचे वितरण येत्या रविवारी (२ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात होणार आहे. यंदा या पुरस्काराच्या रूपाने प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांचा सन्मान केला जाणार आहे. यानिमित्त त्यांचे प्रवचनही होणार आहे.

सामाजिक कामात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीस सावेडीच्या ज्येष्ठ नागरिक मंचाद्वारे दरवर्षी ज्ञान-विज्ञान पुरस्कार दिला जातो. मागील १७ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. यंदा या पुरस्कारासाठी मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराजांची निवड करण्यात आली आहे. अंधत्वावर मात करून धार्मिक व सामाजिक कामात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. भारतीय संस्कृती व मानवी जीवनाच्या दृष्टीने आदर्शाने परिपूर्ण होण्याकरिता नवीन पिढीला चांगल्या प्रवाहात आणणे अत्यंत गरजेचे असल्याने पाथर्डी येथे ज्ञानेश नंदिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून माऊली सद्गुरू धाम वारकरी पाठशाळेची स्थापना त्यांनी केली आहे. सध्या या पाठशाळेत विद्यार्थी वारकरी पंथाचे शिक्षण घेत आहेत. त्यामुळे जाटदेवळेकरांचा पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याचे मंचाच्या अध्यक्ष ज्योती केसकर व कार्यवाह आदिनाथ जोशी यांनी सांगितले.

सावेडी जेष्ठ नागरिक मंचातर्फे आतापर्यंत डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वि. ग. भिडे, डॉ. स्वामी स्वरूपानंद सरस्वती, डॉ. कल्याण गंगवाल, डॉ. रजनीकांत आरोळे, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. माधवराव चितळे, प्रा. डॉ. मधुसूदन कौंडिण्य, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, डॉ. राम शेवाळकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ.श्री बालाजी तांबे, वा. ना. उत्पात , डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. अनिल अवचट, सिंधुताई सपकाळ, माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी आदींना ज्ञानविज्ञान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज