अ‍ॅपशहर

बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन

नोव्हेंबरचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन बँक खात्यात जमा केली असली तरी बँकांवरील वाढत्या कामाचा ताण पाहता बँकेत गर्दी करू नये

Maharashtra Times 2 Dec 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bank rush
बँकेत गर्दी न करण्याचे आवाहन


हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांवरी कामाचा ताण वाढला आहे. नोव्हेंबर महिन्याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन बँक खात्यात जमा केली असली तरी बँकांवरील वाढत्या कामाचा ताण पाहता बँकेत गर्दी करू नये, कर्मचारी व पेन्शनधारकांनी गरज असेल तेव्हा आणि आपल्याला पाहिजे तेवढीच रक्कम खात्यातून काढावी, असे आवाहन वित्त विभागाने केले आहे.

नव्या नोटा घेण्यासाठी, तसेच खात्यातून पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी होत आहे. त्यामुळे बँकांतील कामाचा ताण वाढला आहे. बँकेत आलेल्या नागरिकांचे पैसे भरणे, त्यांना नव्या नोटा देणे या कामातच वेळ जात असल्याने इतर कामे करणे अवघड झाले आहे. राज्यभरातील बँकांमध्ये अशीच परिस्थिती असल्याने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज