एकाला कोठडी; दोघे सुधारगृहात
कर्जत तालुक्यातील भांबोरा गावात शुक्रवारी दुपारी एका शाळकरी मुलीची भररस्त्यात छेड काढणारा मुख्य आरोपी देवगुणे सदाशिव काळे याला पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले.
Maharashtra Times 31 Jul 2016, 12:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
कर्जत तालुक्यातील भांबोरा गावात शुक्रवारी दुपारी एका शाळकरी मुलीची भररस्त्यात छेड काढणारा मुख्य आरोपी देवगुणे सदाशिव काळे याला पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी आरोपीला तीन ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. तर, या प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. इतर दोन आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.
शुक्रवारी दुपारी भांबोरा ते दुधोडी या रस्त्यावर एक मुलगी शाळेतून घरी जात असताना रस्त्याच्याकडेला असलेल्या उसाच्या शेतात लपलेल्या पाच जणांनी रस्त्यावर येऊन तिची छेड काढली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरूद्ध बालकांचे लैंगिक शोषण विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना नगरच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यातील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली. यातील देवगुणे हा मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात आले. त्याला न्यायालयाने तीन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतिश पाटील यांनी बाजू मांडली. आरोपींचे वकीलपत्र मात्र कोणीही घेतले नव्हते.