अ‍ॅपशहर

कापूरवाडी परिसरात पक्ष्यांचा मेळा

अथांग पसरलेल्या निळ्याशार पाण्यात पोहणारी बदके...या पाण्यावरून उडणारे अनेकविध पक्षी...विविध झाडाझुडुपांवर बसून खाद्यावर लक्ष ठेवून असलेले पक्षी... चांदवा, पाणडुबी, खंड्या, चमचा, चक्रवाक अशा विविध पक्ष्यांची आसमंतात पसरलेली किलबिल...असे चित्र सध्या कापूरवाडी तलावावर पाहायला मिळत आहे. हातातील दुर्बिणी व कॅमेरे सावरत निरीक्षण व फोटोग्राफीसह नोंद घेण्यासाठी पक्षीप्रेमींचीही धांदल उडाल्याचे दिसत आहे. या पक्षीनिरीक्षणात तपकिरी डोक्याचा कुरव प्रथमच नगर परिसरात आढळला.

Maharashtra Times 5 Dec 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birds fair in kapuravadi area
कापूरवाडी परिसरात पक्ष्यांचा मेळा

अथांग पसरलेल्या निळ्याशार पाण्यात पोहणारी बदके...या पाण्यावरून उडणारे अनेकविध पक्षी...विविध झाडाझुडुपांवर बसून खाद्यावर लक्ष ठेवून असलेले पक्षी... चांदवा, पाणडुबी, खंड्या, चमचा, चक्रवाक अशा विविध पक्ष्यांची आसमंतात पसरलेली किलबिल...असे चित्र सध्या कापूरवाडी तलावावर पाहायला मिळत आहे. हातातील दुर्बिणी व कॅमेरे सावरत निरीक्षण व फोटोग्राफीसह नोंद घेण्यासाठी पक्षीप्रेमींचीही धांदल उडाल्याचे दिसत आहे. या पक्षीनिरीक्षणात तपकिरी डोक्याचा कुरव प्रथमच नगर परिसरात आढळला.
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेशी संलग्न असलेल्या येथील निसर्ग मित्र मंडळाच्या पुढाकाराने रविवारी ‘चला पक्षी पाहू या’ हा उपक्रम राबविण्यात आला. नगर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बुऱ्हाणनगर रोडला कापूरवाडी तलावाच्या परिसरात अनेक देश-विदेशी पक्ष्यांचा सतत वावर असतो. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमध्ये हा तलाव कोरडा पडला होता. त्यामुळे या परिसरातील पक्षी देखील गायब झाले होते. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या तलावात पाणी आले असून अनेकविध पक्षी या परिसरात येऊ लागले आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहून त्यांचा अभ्यास करता यावा, यासाठी पक्षीमित्रांनी गर्दी केली होती. सात वाजल्यापासून पक्षीनिरीक्षण सुरू झाले. तलावात नजर जाईल तिथपर्यंत दिसणारे अथांग पाणी, झाडा-झुडपात व पाण्यावर तरंगणाऱ्या पक्ष्यांना शोधणाऱ्या पक्षीमित्रांच्या नजरा, दुर्बिणीमधून पक्षी पाहणाऱ्या महिला व चिमुकली मंडळी तर, दुसरीकडे पक्ष्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी छायाचित्रकारांची सुरू असलेली धडपड, असे उत्साही वातावरण होते. पक्षीमित्र डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, बाळासाहेब कुलकर्णी, कार्तिकस्वामी इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पक्षीनिरीक्षण झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज