अ‍ॅपशहर

आरोपींसाठी बनावट फोन

कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली असल्याने त्यांना तातडीने सबजेल येथून येरवडा कारागृहात हलवण्याची सूचना करणारे बोगस फोन केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

Maharashtra Times 3 Dec 2017, 3:00 am
नगर:कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली असल्याने त्यांना तातडीने सबजेल येथून येरवडा कारागृहात हलवण्याची सूचना करणारे बोगस फोन केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (२९ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत मुख्यमंत्र्यांचा पीए व अपर पोलिस महासंचालक यांच्या नावाने हे फोन करण्यात आले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bogus call for accused
आरोपींसाठी बनावट फोन


राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना बुधवारी जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली. या तिन्ही आरोपींना सुनावणीनिमित्ताने नगर येथील सबजेल कारागृहात ठेवण्यात आले होते. बुधवारी दुपारी शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर हे तिन्ही आरोपी न्यायालयात रात्री उशीरापर्यंत होते. परंतु याचदिवशी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेच्या दरम्यान सबजेल येथील लँडलाइन नंबरवर मुख्यमंत्र्याचा खासगी पीए व अपर पोलिस महासंचालक बोलतोय, अशी खोटी माहिती देऊन- कोपर्डीच्या आरोपींना तातडीने येरवडा कारागृहात हलवा, असे सांगितले गेले. हा फोन तोतया व्यक्ती करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून फोनचा रिसिव्हर बाजूला ठेवला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज