अ‍ॅपशहर

‘महावितरण’समोर बोंबाबोंब आंदोलन

तालुक्यातील मौजे गोळेगाव येथे दोन वर्षांपासून वारंवार मागणी करूनदेखील सिंगल फेजचे काम सुरू होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी नगर येथील ...

Maharashtra Times 8 Mar 2018, 2:57 pm
शेवगाव : तालुक्यातील मौजे गोळेगाव येथे दोन वर्षांपासून वारंवार मागणी करूनदेखील सिंगल फेजचे काम सुरू होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी नगर येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच बोंबाबोंब आंदोलन केले. अॅड. शिवाजी काकडे व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bombabomb movement in front of mahavitaran
‘महावितरण’समोर बोंबाबोंब आंदोलन


या बाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील शिववस्ती, बर्डे वस्ती या ठिकाणी सिंगल फेज योजनेला एक वर्षापासून मंजुरीचे आदेश आहेत. हे काम तातडीने सुरू करावे यासाठी गोळेगाव ग्रामस्थ दोन वर्षांपासून महावितरण कार्यालयात चकरा मारत आहेत. काम करण्यास एजन्सी मिळत नसल्याने निविदा प्रक्रिया पूर्ण होत नाही. एजन्सी नेमल्यावर सिंगल फेजचे काम सुरू करू, असे महावितरण कंपनीचे अधिकारी सांगत आहेत. विशेष म्हणजे ज्योतीबा वस्ती येथील सिंगल फेज योजनेसाठी ग्रामस्थांनी कोटेशन भरून सात वर्षे झालेली असतानासुद्धा तेथे योजना मंजूर झालेली नाही. या मुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवारी थेट नगर गाठत महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. आंदोलनात संजय आंधळे, बाळासाहेब बर्डे, बप्पासाहेब बर्डे, महादेव बर्डे, शहादेव काशीद, राजेंद्र राठोड, रमेश मराठे, भागवत राशनकर, अशोक बर्डे, सोमनाथ आंधळे, जगन्नाथ गावडे, बबन आंधळे, जालिंदर बर्डे, शिवाजी राठोड आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. मौजे गोळेगाव येथील शिववस्ती, बर्डे वस्ती, ज्योतीबा वस्ती येथील सिंगल फेजचे मंजूर काम त्वरित सुरू न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली; मात्र, हे काम कधी सुरू करणार ते लेखी द्या, त्या शिवाय माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज