पाथर्डी : बाजार समितीच्या आवारात लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला तडीपार असलेल्या एका गुंडासह पाच जणांनी बेदम मारहाण करत त्याच्याकडील साडेसहा हजार रुपये काढून घेतले. रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेत तडीपार असलेला तरुण संदीप लबडे व त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक करून दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, 'घटनेतील फिर्यादी अजय साठे यांचे शेवगाव रोडच्या लगत दुकान असून रात्री ते आपल्या दुकानाच्या मागे असलेल्या बाजार समितीच्या मोकळ्या आवारात लघुशंकेसाठी गेले होते. त्याचवेळी संदीप लबडे, पवन मोरे, आकाश चन्ने, आकाश चतुर, शुभम काळे हे तेथे आले. त्यांनी अजय साठे यांना हॉकी स्टिक व लोखंडी रॉडने जबर मारहाण करत त्यांच्या खिशात असलेले साडेसहा हजार रुपये काढून घेतले. साठे यांनी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संदीप लबडे व आकाश चन्ने यांना अटक केली आहे. उर्वरित आरोपी फरारी आहेत. संदीप लबडे हा तडीपार असून या पूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना पोलिसांना पाहताच तो पळाला होता. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले होते. त्यानंतर तो पुन्हा शहरात आला व त्याने साठे यांना मारहाण केली.
तडीपार गुंडाकडून मारहाण
बाजार समितीच्या आवारात लघुशंकेसाठी गेलेल्या तरुणाला तडीपार असलेल्या एका गुंडासह पाच जणांनी बेदम मारहाण करत त्याच्याकडील साडेसहा हजार रुपये काढून ...
Maharashtra Times 13 Nov 2018, 4:00 am