नगर : राहुरी येथे दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. एक आरोपी नगर शहरातील व दोन आरोपी राहुरीतील आहेत. आकाश अशोक भिंगारदिवे (रा. सावेडी, नगर), युवराज चंद्रकांत फंड व भिवा उर्फ विठ्ठल कैलास कावळे (रा. राहुरी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील एक आरोपी हा फरार झाला आहे. गेल्या महिन्यात राहुरीतील गिरीश मदन जंगम याचे कॉस्मेटिक दुकान फोडून चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख रक्कम व मोबाइल असा २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले यांनी तपास करत अटक केली.
घरफोडी करणारी टोळी जेरबंद
राहुरी येथे दुकान फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. एक आरोपी नगर शहरातील व दोन आरोपी राहुरीतील आहेत. आकाश अशोक भिंगारदिवे (रा. सावेडी, नगर), युवराज चंद्रकांत फंड व भिवा उर्फ विठ्ठल कैलास कावळे (रा. राहुरी) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत.
Maharashtra Times 20 Feb 2018, 4:04 pm