अ‍ॅपशहर

‘सी. रामचंद्र’ यांच्या गाण्यांची मैफल

‘ए मेरे वतन के लोगो’...’आधा हे चंद्रमा रात आधी’...’कितना हसी है मौसम’...’मेरे पिया गये रंगून’...’आना मेरी जान संडे के संडे’...अशा अवीट गोडीच्या सदाबहार चित्रपट गीतांची आगळीवेगळी मैफल शुक्रवारी (१९ जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजता सावेडी रोडवरील माऊली सभागृहात होणार आहे. ही मैफल सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.

Maharashtra Times 18 Jan 2018, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम c ramchandras songs program
‘सी. रामचंद्र’ यांच्या गाण्यांची मैफल

‘ए मेरे वतन के लोगो’...’आधा हे चंद्रमा रात आधी’...’कितना हसी है मौसम’...’मेरे पिया गये रंगून’...’आना मेरी जान संडे के संडे’...अशा अवीट गोडीच्या सदाबहार चित्रपट गीतांची आगळीवेगळी मैफल शुक्रवारी (१९ जानेवारी) सायंकाळी साडेसहा वाजता सावेडी रोडवरील माऊली सभागृहात होणार आहे. ही मैफल सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.
चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे रामचंद्र चितळकर म्हणजेच संगीतकार सी. रामचंद्र यांचे जन्मशताब्दी वर्ष सध्या सुरू आहे. यानिमित्त शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ‘अलबेला संगीतकार-सी.रामचंद्र’ या संगीत मैफलीचे येथे आयोजन केले आहे. सी. रामचंद्र हे नगर जिल्ह्यातील पुणतांबेजवळील चितळी या गावचे असल्याने व या गावातून सांगीतिक प्रवास सुरू करीत थेट हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःचे अढळ स्थान निर्माण केल्याने त्यांच्या या कार्याला सलाम करण्य़ासाठी मैफलीचे नगरला आयोजन करण्यात आले आहे. सी. रामचंद्र हे हिंदी-मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज संगीतकार मानले जातात. १९४२ ते ७२ अशा तीन दशकांच्या कारकीर्दीत १२० मराठी चित्रपटांसह हिंदी, तामिळ, तेलगु, बंगाली अशा विविध भाषिक चित्रपटात त्यांनी ८०० हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत. यापैकी काही स्वतः गायलीही आहे. त्यापैकी निवडक लोकप्रिय गाण्यांचे सादरीकरण नगरच्या मैफिलीत होणार आहे.
‘अलबेला संगीतकार-सी. रामचंद्र’ या मैफिलीची संकल्पना गोपाळ दामले व प्राची धरमसी यांची आहे. विभावरी जोशी, धवल चांदवडकर, प्रशांत नासेरी हे गायक कलावंत यात सी. रामचंद्रांची विविध गाणी सादर करणार आहेत. केदार परांजपे यांचे संगीत संयोजन असून, मंजिरी जोशी निवेदन करणार आहेत. दर्शना जोग, विशाल थेलकर, निलेश देशपांडे, रमाकांत परांजपे, प्रवीण जोशी, प्रसाद गोंदकर, अजय अत्रे, केदार मोरे, विक्रम भट, प्रवीण जोशी व निलेश यादव आदींची वाद्यवृंद साथसंगत आहे. या मैफिलीच्या मोफत प्रवेशिका रिशिका एंटरप्रायजेस (प्रोफेसर कॉलनी चौक) व रुपवेध क्रिएशन (माऊली सभागृहासमोर) उपलब्ध असून, नगरकर संगीत रसिकांनी या मैफिलीस उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज