अ‍ॅपशहर

‘कॅशलेस’साठी जिल्ह्यातील २८ गावे

. कॅशलेस व्यवहारांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यासाठी ग्रामसभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आता गावेच कॅशलेस करण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन याप्रमाणे २८ गावांची निवड कॅशलेस व्यवहारांसाठी केली आहे.

Maharashtra Times 3 Jan 2017, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cashless villege
‘कॅशलेस’साठी जिल्ह्यातील २८ गावे


जिल्हा परिषदेने कॅशलेस व्यवहारांच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. कॅशलेस व्यवहारांची माहिती ग्रामीण भागातील नागरिकांना देण्यासाठी ग्रामसभा बोलावण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आता गावेच कॅशलेस करण्यासाठी नियोजन केले जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन याप्रमाणे २८ गावांची निवड कॅशलेस व्यवहारांसाठी केली आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना कॅशलेस व्यवहार कसे करावेत, याचे प्रशिक्षण देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात पंचायत समित्या व ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच गावातील नागरिकांनाही याबाबत माहिती होऊन कॅशलेस व्यवहार करता यावेत याची माहिती दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील २८ गावांची निवड केली आहे. या गावांतील नागरिक, छोटे व्यावसायिक, विमा एजंट, हॉटेल व्यावसायिक, स्वस्त धान्य दुकानदार यांना कॅशलेस व्यवहारांचे मार्गदर्शन केले जाणार आहे. गावात ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहेत त्यांना पेटीएम, एसबीआय बडी, मोबी क्विक यांसारखी अॅप्लिकेशन डाउनलोड करून देऊन याद्वारे व्यवहार कसे करावेत, याचीही माहिती दिली जाणार आहे.

कॅशलेस व्यवहारांची माहिती नागरिकांना देण्यासाठी गावांत विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. कॅशलेस व्यवहारांसाठी बँकांकडून स्वाईप मशीन उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. याबाबत कामे पूर्ण करण्यासाठी आता १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहेत. त्यानंतर पंचायत समित्यांना अहवाल जिल्हा परिषदेस पाठवावे लागणार आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेने निवडलेली ही गावे राज्य सरकारच्या स्मार्ट ग्राम योजनेसाठीही आधीच निवडली गेली आहेत, त्यामुळे कॅशलेस व्यवहारात जास्त अडचणी येणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कॅशलेससाठी निवडलेली गावे

नवलेवाडी, सुगाव बुद्रुक (ता. अकोले), सावरगावतळ, निमगाव बुद्रुक (ता. संगमनेर), दहिगाव बोलका, येसगाव (ता. कोपरगाव), लोणी बुद्रुक, लोणी खुर्द (ता. राहता), शिरसगाव, खंडाळा (ता. श्रीरामपूर), कुरणवाडी, गणेगाव (राहुरी), नजिक चिंचोली, गोगलगाव (ता. नेवासा), कांबी, अमरापूर (ता. शेवगाव), पारेवाडी, लोहसर (ता. पाथर्डी), मोहा, नायगाव (ता. जामखेड), मांदळी, निमगाव गांगर्डा (ता. कर्जत), आर्वी अनगरे, निमगाव खलू (ता. पारनेर), हिवरेबाजार, दहिगाव (ता. नगर)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज