अ‍ॅपशहर

कास्ट्राईबचे लवकरच लवकरच राज्य अधिवेशन

शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अधिवेशन येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य महासचिव देवानंद वानखेडे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येऊन त्यांचे प्रश्न सोडविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Times 24 Apr 2017, 3:00 am
नगर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी लवकर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अधिवेशन येथे घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य महासचिव देवानंद वानखेडे यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर येऊन त्यांचे प्रश्न सोडविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम castraib state convention
कास्ट्राईबचे लवकरच लवकरच राज्य अधिवेशन

महासंघाची बैठक जिल्हा परिषदेतील संघटनेच्या कार्यालयात राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. या वेळी वानखेडे, जिल्हाध्यक्ष के. के. जाधव, सुबोध साबळे, विलास जगताप, वसंत थोरात, माया जाधव, डी. एन. केंद्रे, बाळासाहेब जाधव, सुरेश पिंपळे, श्याम थोरात, गुलाब जावळे आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे जाधव यांनी सांगितले. लवकरच संघटनेचे राज्य अधिवेशन घेण्यात येणार असून, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आंदोलनात्मक भूमिका घेतली जाणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. जिल्हास्तरावर नोकरभरती शिबिर, अनुशेष भरती, कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या विनाअट करण्याबाबत शासनस्तरावर संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती पवळे यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज