अ‍ॅपशहर

सिटीझन रिपोर्टरचा स्मार्टफोनने गौरव

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘सिटीझन रिपोर्टर’ उपक्रमात एप्रिल व मे महिन्यातील उत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारे स्मार्टफोनचे बक्षीस दिनेश कुलकर्णी यांना मिळाले आहे.

Maharashtra Times 21 Jun 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम citizen reporter prize
सिटीझन रिपोर्टरचा स्मार्टफोनने गौरव


‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘सिटीझन रिपोर्टर’ उपक्रमात एप्रिल व मे महिन्यातील उत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारे स्मार्टफोनचे बक्षीस दिनेश कुलकर्णी यांना मिळाले आहे. 'मटा'च्या कार्यालयात सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना स्मार्ट फोन प्रदान करण्यात आला.

गेल्या आठवड्यात उल्लेखनीय काम केलेले 'सिटीझन रिपोर्टर' सचिन गुलदगड व सूरज नामदे यांचाही या वेळी प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. नागरी समस्या आणि अन्य बातम्या पाठविणे नागरिकांना सोपे जावे, यासाठी 'सिटीझन रिपोर्टर' अॅप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे. याद्वारे सातत्यपूर्ण, वैविध्यपूर्ण आणि प्रभावी बातम्या पाठविणाऱ्या एका 'सिटीझन रिपोर्टर'ला स्मार्टफोन बक्षीस देण्यात येतो. गेल्या दोन महिन्यांतील कामगिरीबद्दल दिनेश कुलकर्णी विजेते ठरले. कुलकर्णी एका बँकेत नोकरीला आहेत. नोकरी सांभाळून सामाजिक कार्य आणि प्रश्न मांडण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून या अॅप्लिकेशनद्वारे बातम्या पाठवित आहे. आता माझी परिसरात आणि कार्यालयातही ‘सिटीझन रिपोर्टर’ म्हणून ओळख झाली आहे. कोठे काही समस्या दिसली तर नागरिक मला फोन करून सांगतात. ‘मटा’मुळे मला ही ओळख मिळाली. स्मार्टफोनही मिळाला, त्याचा आनंद आहे.
- दिनेश कुलकर्णी

खूप वर्षांपासून ‘मटा’ वाचतो. आता त्यामध्ये लिहिण्याची संधी 'सिटीझन रिपोर्टर'च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. प्रश्न मांडले गेल्याचे समाधान वाटते. त्याच जो प्रभाव पडतो, ते पाहून तर आणखी बरे वाटते. नागरिकांना आपल्या भागातील प्रश्नांसंबंधी अशी जागरुकता दाखविली तर यंत्रणेला नक्कीच दखल घ्यावी लागेल.
- सचिन गुलदगड

हे अॅप्लिकेशन वापरण्यासाठी एकदम सोपे आहे. यामध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर ओळखीचे लोक कशाला या भानगडीत पडतो, असे म्हणायचे. आता बातमी प्रसिद्ध झाल्यावर फोन करून कौतुक करतात. प्रश्न मार्गी लागल्यावर धन्यवादही देतात. त्यामुळे कामाचा उत्साह वाढला आहे.
- सूरज नामदे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज