अ‍ॅपशहर

एक अक्षर चुकलं म्हणून विद्यार्थ्याला मारहाण

शाळेत लिहिताना एक अक्षर चुकले म्हणून वर्गशिक्षकाने विद्यार्थ्यास छडीने व लाथांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी वर्गशिक्षक सतीश किसन भुतांबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Maharashtra Times 8 Dec 2016, 3:03 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम class teacher booked for beating student
एक अक्षर चुकलं म्हणून विद्यार्थ्याला मारहाण

शाळेत लिहिताना एक अक्षर चुकले म्हणून वर्गशिक्षकाने विद्यार्थ्यास छडीने व लाथांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी वर्गशिक्षक सतीश किसन भुतांबरे याला पोलिसांनी अटक केली आहे.

संगमनेर तालुक्यातील गारोळे पठार येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी ही घटना घडली. किशोर रामदास केदार (वय ८, रा. गारोळे पठार) हा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. बुधवारी शाळेत भुतांबरे मुलांचा अभ्यास घेत होता. त्यावेळी लिहिताना किशोरचे एक अक्षर चुकले. याचा राग येऊन भुतांबरेनं त्याला लाकडी छडीने हातावर व पायावर मारले. भुतांबरे एवढ्यावरच थांबला नाही, त्यानं किशोरला लाथांनी व गुडघ्यानेही मारले. यात किशोरला बरीच दुखापत झाली. घरी गेल्यावर त्याला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्याने याबद्दल आपल्या आईवडिलांना सांगितले. किशोरची अवस्था पाहून आईवडिलांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आणि वडील रामदास केदार यांनी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली.

केदार यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षक भुतांबरे याच्याविरुद्ध मारहाणीचा तसंच, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २००० चा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज