अ‍ॅपशहर

नगरमध्ये पारा ३ अंशांवर

नगरमध्ये तीव्र थंडीची लाट आली असून, शनिवारी पहाटे किमान तापमान ३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नीचांकी तापमानाचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. आणखी एक दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Dec 2018, 6:15 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम cold


नगरमध्ये तीव्र थंडीची लाट आली असून, शनिवारी पहाटे किमान तापमान ३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. नीचांकी तापमानाचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. आणखी एक दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

मुंबईतील कुलाबा येथील वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगरमध्ये शनिवारी पहाटे राज्यातील नीचांकी तापमान ३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सध्या उत्तरेकडील बहुतांश राज्यांत थंडीची तीव्र लाट आलेली आहे. अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली उतरला असून, उणे तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून वाहणारे वारे नगरपर्यंत गारठा घेऊन आले आहेत. त्यामुळे गुजरातच्या काही भागासह उत्तर-मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट आली आहे. याशिवाय मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

नगरमध्ये घसरलेल्या तापमानामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पहाटे फिरायला बाहेर पडणाऱ्यांसोबतच सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांचे हाल होत आहेत. शेतीचे काम, उसतोडणीच्या कामावरही याचा परिणाम होत आहे. केवळ सकाळीच नव्हे, तर दुपारपर्यंत झोंबणारे थंड वारे वाहत आहेत. याचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्दी-खोकला आणि घशाच्या विकाराचे रुग्ण वाढले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे तर वापरावेतच, शिवाय डोळ्यांचीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज