अ‍ॅपशहर

कॉलेजिअन्सच्या बाप्पांचे दणक्यात विसर्जन

ढोल–ताशांच्या गजरावर थिरकरणारी तरुणाई....हलगीच्या तालावर लेझीम खेळणाऱ्या तरुणी.... आणि एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार"... "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणांनी दुमदुमलेला कॉलेज कॅम्पसचा परिसर... अशा उत्साहाच्या वातावरणात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज इंजिनीअरिंग कॉलेज व न्यू लॉ कॉलेज या दोन महाविद्यालयांतील गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

Maharashtra Times 10 Sep 2016, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम collage ganpati
कॉलेजिअन्सच्या बाप्पांचे दणक्यात विसर्जन

ढोल–ताशांच्या गजरावर थिरकरणारी तरुणाई....हलगीच्या तालावर लेझीम खेळणाऱ्या तरुणी.... आणि एक दोन तीन चार... गणपतीचा जयजयकार"... "गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणांनी दुमदुमलेला कॉलेज कॅम्पसचा परिसर... अशा उत्साहाच्या वातावरणात शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज इंजिनीअरिंग कॉलेज व न्यू लॉ कॉलेज या दोन महाविद्यालयांतील गणरायांचे विसर्जन करण्यात आले.

शहरात सार्वजनिक मंडळांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज इंजिनीअरिंग कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, न्यू आर्टस् कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, विखे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आयबीएमआरडी कॉलेज, राधाबाई काळे महिला महाविद्यालय, कॉलेज ऑफ फार्मसी, अशा विविध कॉलेजांमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते.

यापैकी गणेश प्रतिष्ठापना केल्यानंतर येणाऱ्या पाचव्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज इंजिनीअरिंग कॉलेज व न्यू लॉ कॉलेजमध्ये बसवण्यात आलेल्या गणरायांचे विसर्जन करण्यात येते. शुक्रवारी या दोन्ही कॉलेजांनी ढोल–ताशांच्या गजरात वाजतगाजत, गुलालाची उधळण करीत विसर्जन मिरवणूक काढली.

मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले तरुणींचे लेझीम पथक हे लक्षवेधी ठरले. तर, कॉलेजच्या तरुणांनी ढोल–ताशांच्या निनादावर थिरकणे पसंत केले. कॉलेजचे प्राध्यापकही मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.

या निमित्ताने गणेशोत्सव काळात घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज