अ‍ॅपशहर

मतदार नोंदणीस टाळाटाळ

महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाकडे देण्यात आली असून, यासाठी मतदार नोंदणी कक्ष उभारायचा आहे.

Maharashtra Times 29 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम college avoid voter registration
मतदार नोंदणीस टाळाटाळ

महाविद्यालयामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाकडे देण्यात आली असून, यासाठी मतदार नोंदणी कक्ष उभारायचा आहे. परंतु या कामाबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने अनुत्सूकता दाखविली असून, या कामासाठी प्राध्यापकांची नोडल अधिकारी नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने प्राचार्यांच्या बैठका घेऊन याबाबत सूचना दिल्या आहेत.
१८ वर्ष वय पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करावे, अशा सूचना राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. कॉलेज, तंत्रशिक्षण संस्थेमध्ये प्रथम वर्षाला प्रवेश देताना विद्यार्थ्यांनाकडून हमीपत्र घेऊन नाव नोंदणीचे अर्ज भरून घ्यावेत, त्यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये मतदार नाव नोंदणी कक्ष उभारण्यात यावा, त्यासाठी एका प्राध्यापकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी. या नोडल अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून भरून घेतलेले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायवेत, अशा सूचना आहे. परंतु महाविद्यालया प्रशासनाकडून याबाबत काहीच कामकाज झाले नाहीत. त्यामुळे आता उपविभागीय अधिकारी हे महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा बैठका घेऊन याबाबत माहिती देत आहेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी शहरातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली.
त्यात अनेक प्राचार्यांनी विद्यार्थ्यांच्या मतदार नाव नोंदणीबाबत माहिती नसल्याचे बैठकीत सांगितले. यात केवळ न्यू आर्टस महाविद्यालयाकडून एका प्राध्यापकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. इतर महाविद्यालयांनी नोडल अधिकारी नेमलेले नाहीत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज