अ‍ॅपशहर

पिकअप, कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावर बोटा (ता. संगमनेर) येथे गुरुवारी (२९ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर पिकअप जिप व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात एक जण मृत्युमुखी पडला तर तिघेजण जखमी झाले. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 30 Sep 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम container pick ups accident causes ones death
पिकअप, कंटेनरच्या अपघातात एकाचा मृत्यू


नाशिक-पुणे महामार्गावर बोटा (ता. संगमनेर) येथे गुरुवारी (२९ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर पिकअप जिप व कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात एक जण मृत्युमुखी पडला तर तिघेजण जखमी झाले. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रवीण सुरेश कोकणे (वय २२) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. घारगाव पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार एन. बी. धांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार संगमनेरकडून पुण्याकडे जाणारा कंटेनर (क्र. एच आर ५५ व्ही ०५७७) व आळेफाट्याकडून साकूर फाटा येथे जाणारी पिकअप जिप (क्र. एम.एच १४ इ.एम. ४४०२) यांची नाशिक-पुणे महामार्गावरील बोटा परिसरातील विद्यानिकेतन इंजिनीअरिंंग कॉलेजजवळ धडक होऊन झालेल्या अपघातात जीपमधील प्रवीण कोकणे चा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोमधील त्याचे भाऊ नितीन सुरेश कोकणे (वय २७), सागर सुरेश कोकणे (वय २५) व रोहिदास अर्जुन नांगुडे (वय ४०) हे तिघेजण जखमी झाले. या अपघातातील जखमी व मृत हे सर्वजण शेजारील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कांदळी येथील रहिवासी आहेत. जखमींना आळेफाटा येथे दाखल करण्यात आले आहे. विजय गंगाराम भोर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक सतीश पाटोळे तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज