अ‍ॅपशहर

नगर जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रुग्णांची करोनावर मात

अहमदनगर जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारलाही दिलासा देणारी बातमी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ३८ करोना रुग्णांपैकी आतापर्यंत तब्बल २४ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2020, 5:00 pm
अहमदनगर: राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत असला तरी अनेक जिल्ह्यांत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण खूपच आशादायक आहे. नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी करोनावर मात केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Nagar


Live: औरंगाबादमध्ये आतापर्यंत २२ करोनामुक्त

नगर जिल्ह्यात आतपर्यंत ३८ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामधील तब्बल ७ रुग्ण हे मागील दोन दिवसांत सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या वाढल्यामुळे काहीशी चिंता होती. मात्र, शुक्रवारी येथील बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आलमगीर येथील दोन, सर्जेपुरा येथील एक व आष्टी (जि. बीड) येथील एक, अशा चार ‘करोना’बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. चारही रुग्णांचे १४ दिवसानंतरच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वाचा: संशयित रुग्ण २२ तास मृतदेहांच्या सहवासात

जिल्ह्यामध्ये आढळलेल्या ३८ ‘करोना’बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत २४ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एक, अशा दोन करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. उर्वरीत १२ बाधित रुग्णांवर बूथ हॉस्पिटलच्या आयसोलेशन वार्डमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर तालुक्यातील ४, जामखेड तालुक्यातील ५, नेवासा तालुक्यातील २ व एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे.

मुंबईतील १८९ कंटेन्मेंट झोनमध्ये नवा रुग्ण नाही!

बीएमसीच्या आपत्ती नियंत्रण कक्षातही करोना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज