अ‍ॅपशहर

कायद्यांमध्ये दुरूस्ती आवश्यकच

‘आपल्या देशातील सर्वच कायदे भक्कम आहेत, मात्र त्यातील काहींची अंमलबजावणी करताना गैरवापर होत असेल तर त्यात दुरूस्ती करण्याची गरज आहे. कायद्याचा दुरूपयोग होत असेल तर त्यात दुरूस्ती झालीच पाहिजे, मात्र केवळ आंदोलने करून हे काम होणार नाही,’ असे मत विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले

Maharashtra Times 25 Sep 2016, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम correction in law
कायद्यांमध्ये दुरूस्ती आवश्यकच


‘आपल्या देशातील सर्वच कायदे भक्कम आहेत, मात्र त्यातील काहींची अंमलबजावणी करताना गैरवापर होत असेल तर त्यात दुरूस्ती करण्याची गरज आहे. कायद्याचा दुरूपयोग होत असेल तर त्यात दुरूस्ती झालीच पाहिजे, मात्र केवळ आंदोलने करून हे काम होणार नाही,’ असे मत विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. पंडित दीनदयाळ यांच्या शताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानमालेत अॅड. निकम बोलत होते. या वेळी लखनौ विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक शांतीभाई चंदे उपस्थित होते. दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, मानद सचिव विकास पाथरकर या वेळी व्यासपीठावर होते. निकम म्हणाले, ‘संविधानाने सर्व व्यक्तींची कायद्यापुढील समानता मान्य केली आहे. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीत कुठल्याही व्यक्तीचे वैयक्तिक संचार स्वातंत्र्य हिरावून घेता येत नाही. अपराध्यांना सुद्धा दोषसिद्धीबाबत संरक्षण देण्यात आलेले आहे. कुठल्याही व्यक्तीस न्याय मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे मोकळे ठेवण्यात आले आहेत. असा समान अधिकार सर्वांना उपलब्ध आहे. या मधूनच समाजातील कायदा व सुव्यवस्थाही राखली जाते. समाजात शांतता प्रस्थापित ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपआपल्या व्यवसायात प्रामणिक राहिले पाहिजे, व्यवसाय कोणताही असो तो पवित्र राहील याची काळजी आपण घेतली पाहिजे.’

कायदा, व सुव्यवस्था विषयी बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशामध्ये कधी कधी कायद्याची पायमल्ली होते. कायद्याचा दुरुपयोग केला जातो. परंतु कायद्याचा दुरूपयोग होत असेल तर त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, परंतु आपण त्या विरोधात बंद पुकारतो ही बाब अत्यंत चुकीची आहे. जो पाप करेल त्याला कायद्याप्रमाणे शिक्षा मिळत असते, समाजाने न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या कायद्याची दाखल इतर देश घेत आहेत. इतर देश आपले विचार आत्मसात करून त्याची अंमलबजावणी करत आहेत. याचा विचार प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज