अ‍ॅपशहर

‘स्थायी’ अध्यक्षांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

एकदा जमिनीचे खरेदीखत झाले असताना बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याला जमिनीची विक्री केल्याप्रकरणी येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश कांकरिया, त्यांच्या पत्नी सुधा कांकरिया व मनपाचे स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांनी मिळून मुंबई येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे.

Maharashtra Times 24 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime against nine people including standing chairman
‘स्थायी’ अध्यक्षांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

एकदा जमिनीचे खरेदीखत झाले असताना बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्याला जमिनीची विक्री केल्याप्रकरणी येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रकाश कांकरिया, त्यांच्या पत्नी सुधा कांकरिया व मनपाचे स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव यांच्यासह नऊ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्वांनी मिळून मुंबई येथील एका व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे.
या प्रकरणी मुंबई येथील व्यापारी पवन चंदुलाल खेमाणी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कांकरिया दांपत्य, मनपाचे सभापती जाधव, संजय भगवान बुधवंत, रफिस हुसेन शेख, मोहमंद उमर इब्राहीम शेख, सादिक शेख, योगेश बाळू शिंदे, गौरव पांडूरंग बेल्हेकर (सर्व राहणार नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ८ हजार ९३ चौरस मीटर बिगर शेती जमिनीवरील परिवहन खात्याच्या कार्यालयाच्या मालकीचे आरक्षण हटविल्यानंतर मुंबई येथील व्यापारी खेमाणी व कांकरिया यांच्यामध्ये जमिनीची हिस्सेदारी ठरली होती. ही जागा उद्योगाच्या दृष्टीने महत्वाची होती. परंतु गेल्या वर्षी कांकरिया यांना मुलाच्या हॉस्पिटल करिता पैसे आवश्यक होते. त्यांनी आपला हिस्सा खेमाणी यांना तीन कोटी एक लाख रुपये किमतीला विकला होता. तसे खरेदीखत लिहून देऊन जमिनीचा ताबा पावती दिली होती. परंतु त्यानंतर खोटे दस्तऐवज तयार करून संजय बुधवंत यांनी खरेदी केली होती. त्यात स्थायी समितीचे सभापती सचिन जाधव व इतर आरोपींनी मदत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज