अ‍ॅपशहर

शनिदर्शनासाठी भाविकांची गर्दी

शनी अमावस्या आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे भाविकांनी शनिशिंगणापुरात शनिवारी गर्दी केली. लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले.

Maharashtra Times 25 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crowd of devotees
शनिदर्शनासाठी भाविकांची गर्दी

शनी अमावस्या आणि सलग सुट्ट्या आल्यामुळे भाविकांनी शनिशिंगणापुरात शनिवारी गर्दी केली. लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. झिम्बाब्वे येथील उद्योगपती जयेश शहा व खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. दिल्ली व हरयाणा येथील भक्त मंडळांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शनी अमावस्या असल्याने शिंगणापूरला सकाळपासूनच गर्दी वाढली होती. राज्यासह बाहेरच्या राज्यातील भाविक येथे दर्शनासाठी आले. सलग सुट्ट्यांची यामध्ये भर पडल्याने गर्दी जास्त वाढली. गर्दी वाढण्याचा अंदाज असल्याने देवस्थानने नियोजन केले होते. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. याठिकाणी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली होती. देवस्थाननेही वाहन पार्किंगची व्यवस्था केली होती. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहने योग्य ठिकाणी पार्क करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. शनिवारी दिवसभर भाविक दर्शनासाठी येथे येतच होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज