अ‍ॅपशहर

‘मुळा’तील मासेमारी ठेका रद्द करा

मुळा धरणातील मासेमारीचा ठेका मुंबईतील कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करत हा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी पीपल्स् हेल्पलाइन संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

Maharashtra Times 28 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम demand of withdraw contract of fishery
‘मुळा’तील मासेमारी ठेका रद्द करा


मुळा धरणातील मासेमारीचा ठेका मुंबईतील कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध करत हा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी पीपल्स् हेल्पलाइन संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. राज्याचे पशुसंवर्धन व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांची आंदोलकांनी भ्रष्टाचार चिंगळीतुला केली.

जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने मुळा धरण भरले आहे. या धरणातील मासेमारीवर आसपासच्या पंधरा ते वीस गावांतील आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. तसेच ‘मुळा’थडी मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थाही येथे कार्यरत आहे. परंतु, सरकारने मात्र परस्पर मासेमारीचा ठेका ऑनलाइन पद्धतीने मुंबईस्थित एका कंपनीला दिला आहे. या निर्णयामुळे येथील स्थानिकांचा रोजगार हिरावला आहे. सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुळा धरणातील २०१७ ते २०२१ या पाच वर्षांसाठीचा हा मासेमारीचा ठेका त्वरित रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात संघटनेचे संचालक अॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, मधुकर बनसोडे आदी आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज