अ‍ॅपशहर

नगर शहरामध्ये डेंगीची साथ

मोठे बंगले व घरांतील शोभेच्या फुलदाण्या, रोपांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या व अन्य साहित्यात साठलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने शहरातील उच्चभ्रू मंडळी डेंगीच्या सावटाखाली असल्याचे चित्र आहे. महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत डेंगीचे ४०२ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ४४ जणांना डेंगीची लागण झाली आहे.

Maharashtra Times 29 Jul 2016, 3:00 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dengue in nagar city
नगर शहरामध्ये डेंगीची साथ

मोठे बंगले व घरांतील शोभेच्या फुलदाण्या, रोपांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या व अन्य साहित्यात साठलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याने शहरातील उच्चभ्रू मंडळी डेंगीच्या सावटाखाली असल्याचे चित्र आहे. महापालिका हद्दीमध्ये आतापर्यंत डेंगीचे ४०२ संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी ४४ जणांना डेंगीची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांपैकी बहुतांशजण हे उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारे आहेत.

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील डेंगी पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या या उच्चभ्रू नागरिकांच्या घरामध्येच जास्त आढळत आहेत. त्यामुळे शहर व उपनगराच्या परिसरातील उच्चभ्रू मंडळींनी स्वतःच्या आरोग्याच्या रक्षणासाठी परिसर स्वच्छतेसह अनेक दिवसांचे साठलेले पाणी काढून टाकण्याची आवश्यकता आहे.

बंगले व फ्लॅटमध्ये राहणाऱ्या उच्चभ्रू नागरिकांच्या घराच्या परिसरात कुंड्या, फुलदाणी, टायर्स, पाण्याचे हौद आदी साहित्य जास्त प्रमाणात आढळत असून, त्यामध्ये डेंगी पसरवणाऱ्या डासाच्या अळ्या महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आढळत आहेत. त्यामुळे शहरामध्ये डेंगीचा फैलाव होऊ नये, यासाठी उच्चभ्रू भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे प्रयत्न मनपाच्यावतीने सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, शहरामध्ये ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेले एकूण १३८ डेंगी संशयित रुग्ण असल्याची नोंदही मनपाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.

शहरामध्ये डेंगी आटोक्यात आणण्यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाच्यावतीने स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आले आहेत. डेंगी रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच, संबंधित भागात ही पथके जाऊन पाणी तपासणी व जनजागृती करते. यामध्ये प्रामुख्याने बंगले, फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरामध्येच डेंगी पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे आपल्या घराच्या आवारात कुठेही स्वच्छ पाणी साचणार नाही, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच घरामध्ये असणाऱ्या निरुपयोगी वस्तू (उदाः टायर्स, भंगार साहित्य आदी) हे अंगणामध्ये, गॅलरीमध्ये, छतावर ठेवू नये. मात्र, काही कारणाने असे साहित्य ठेवण्याची वेळ आल्यास त्यामध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घेतली जावी.
- डॉ. अनिल बोरगे,
वैद्यकीय अधिकारी, मनपा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज