अ‍ॅपशहर

‘रयत’च्या उन्नतीसाठी दातृत्वाची भूमिका बजावावी’

रयत शिक्षण संस्था उभारण्यासाठी एकेकाळी समाजाने प्रचंड योगदान दिले होते. त्याचप्रमाणे आता रयतच्या उन्नतीसाठी समाजाने दातृत्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले.

Maharashtra Times 25 Sep 2017, 3:00 am
नगर : रयत शिक्षण संस्था उभारण्यासाठी एकेकाळी समाजाने प्रचंड योगदान दिले होते. त्याचप्रमाणे आता रयतच्या उन्नतीसाठी समाजाने दातृत्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम development of rayat education institute
‘रयत’च्या उन्नतीसाठी दातृत्वाची भूमिका बजावावी’

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील होते. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बबनराव पाचपुते, मिनाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे सचिव भाऊसाहेब कराळे, उत्तर विभागाचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर उपस्थित होते. पवार म्हणाले, उत्तर विभाग मोठा असून, या विभागाला कार्यालयाची गरज होती. या इमारतीमुळे कार्यालयाची गरज पूर्ण झाली आहे. संस्थेचे कर्मचारी व ज्ञान देणारे घटक असलेला शिक्षक यांच्यामुळे या संस्थेची उभारणी झाली आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेऊ शकली.

पुरस्कार संस्थेला

या संस्थेतील शिक्षिका शर्मिला महेश पाटील यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारात ५१ हजार रुपये रक्कम मिळाली आहे. या रक्कमचा धनादेश शिक्षिका पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे संस्थेसाठी दिला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले या संस्थेत शिकत असून, त्यांच्या शिक्षणासाठी ही मदत संस्थेला देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज