अ‍ॅपशहर

हैदराबादच्या भक्ताकडून साई चरणी दोन कोटी रुपयांचे ४ किलो सोने दान

हैदराबाद येथील पार्थ रेड्डी या साईभक्ताने ४ किलो वजनाचे तब्बल २ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे सोने साईचरणी दान दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. यानंतर रेड्डी यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2022, 11:17 pm
शिर्डी : फकिराचे आयुष्य जगलेल्या शिर्डीच्या साईबाबांवर (Sai Baba) जगभरातील करोडो भाविकांची अपार श्रद्धा आहे. साई दर्शनासाठी शिर्डीत आल्यावर किंवा ऑनलाइन स्वरूपात अनेकजण आपआपल्या परीने साईचरणी दान करत असतात. हैदराबाद येथील एका भाविकाने साई चरणी दोन कोटींपेक्षा जास्त रुपयांचे सोने दान केले आहे. या दानाची चर्चा सध्या सर्वत्र ऐकायला मिळत आहे. (Devotees from Hyderabad donated gold worth Rs 2 crore to Sai Baba of Shirdi)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम devotees from hyderabad donated gold worth rs 2 crore to sai baba of shirdi
हैद्राबादच्या भक्ताकडून साई चरणी ४ किलोचे वजनाचे दोन कोटी रुपयांचे सोने दान


हैदराबाद येथील पार्थ रेड्डी या साईभक्ताने ४ किलो वजनाचे तब्बल २ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे सोने साईचरणी दान दिले असल्याची माहिती साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. यानंतर रेड्डी यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

क्लिक करा आणि वाचा- 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण...'; कलाकारांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर आदेश बांदेकर म्हणाले…

साईबाबांच्या भक्तांमध्ये दक्षिण भारतातील लोकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापूर्वी साईभक्त के.व्ही रमणी यांनी साईबाबा संस्थानला शंभर कोटी रुपये दान दिले होते. तर आर. रेड्डी यांनी सोन्याचे सिंहासन दान दिलेले आहे. त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दान करणारे पार्थ रेड्डी हे तिसरे दक्षिण भारतीय साईभक्त ठरले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- '८५ वर्षांच्या वयात उपोषण होणार नाही हीच इच्छा', अण्णांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शिर्डीचे साईमंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती पावले आहे. देश विदेशातून येणारे भाविक इथे सढळ हाताने मोठ्या प्रमाणात दान करतात. तिरुपती बालाजी नंतर देशात दोन नंबरचे श्रीमंत देवस्थान म्हणून साईसंस्थान नावारूपाला आले आहे. साईबाबा संस्थानकडे अडीच हजार कोटी रुपयांच्या ठेवी, पाचशे किलोपेक्षा जास्त सोने तर मोठया प्रमाणावर चांदी आहे. दान पेटीतील दानासह वस्तू स्वरूपातील दानाचा ओघ साई संस्थानला सातत्याने सुरूच असतो. लॉकडाऊनच्या संकटानंतरही दिवसेंदिवस साईबाबांच्या झोळीत दानाचा हा ओघ सुरूच आहे.

क्लिक करा आणि वाचा- 'केतकीला आपल्या क्षेत्रात नाव कमावता येत नसल्यामुळेच…'; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

हैदराबाद येथील हेक्ट्रॉ कंपनीचे चेअरमन पार्थ रेड्डी या साई भक्ताने साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेची परवानगी घेऊन साईबाबांच्या मूर्तीच्या पादुका खालील भागास नक्षीदार डिझाईन केलेले ४ किलो वजनाचे २ सुमारे २ कोटी रुपये किमतीचे सोने साईबाबांच्या चरणी अर्पण केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज