अ‍ॅपशहर

कृषी सहाय्यकांच्या संपाने कामकाज विस्कळीत

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी सुरू केलेल्या संपामुळे कृषी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत झाले आहे.

Maharashtra Times 25 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम disrupted work of agricultural assistants
कृषी सहाय्यकांच्या संपाने कामकाज विस्कळीत

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी सुरू केलेल्या संपामुळे कृषी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत झाले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास सर्वच कृषी सहाय्यक सहभागी झाल्यामुळे तालुकास्तरावरील कार्यालयांची माहिती जिल्हा कार्यालयास मिळणे बंद झाले आहे. कृषी सहाय्यकांनी मात्र आंदोलन सुरुच ठेवले असून २७ तारखेला विभागीय कृषी सहसंचालकांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे.
राज्य सरकारने स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाची स्थापना केली आहे. या विभागाने कृषी सहायकास पदोन्नतीने मिळणाऱ्या पर्यवेक्षकांची सर्वच पदे आपल्याकडे घेतली आहेत. त्यामुळे भविष्यात कृषी सहायकांना पदोन्नतीसाठी कृषी विभागात पदच राहत नाही. ही पदे जलसंधारण विभागाकडे वर्ग झाल्याने कृषी विभागावर कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेकडून १९ जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. आंदोलन सुरू असल्याने कामकाज मात्र विस्कळीत झाले आहे. गावांमध्ये कृषी सहाय्यकांचा संपर्क असल्याने कृषी विभागाच्या योजना सहाय्यकांमार्फतच राबवल्या जातात. शेतकऱ्यांना खते बियाण्यांचे वाटप, त्यांच्या नोंदी घेणे, अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे, वरिष्ठ कार्यालयास माहिती देणे यांसारखी कामे केली जातात. संपामुळे ही कामे जवळपास ठप्प झाली आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी उपोषण शुक्रवारी सायंकाळी संपले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज