अ‍ॅपशहर

जगभरातील ६९३ मारुती मंदिरांवर माहितीपट

अमेरिकेतील ताओस, न्यू मॅक्सिको, न्यू जर्सी, इंडोनेशिया, थायलंड, पाकिस्तान, श्रीलंकेसह भारतातील प्रमुख मारुती मंदिरे तसेच समर्थ रामदास स्वामींना स्थापन केलेले ११ मारुती, पुण्याचे प्रसिद्ध मारुती, नगरचे अष्ट मारुती अशा तब्बल ६९३ मारुती मंदिरांच्या माहितीवर आधारीत माहितीपट येथील हरहुन्नरी कलावंत डॉ. अमोल बागुल यांनी तयार केला आहे. मंगळवारी (२१ फेब्रुवारी) या माहितीपटाचे प्रकाशन होणार आहे.

Maharashtra Times 21 Feb 2017, 3:00 am
नगर ः अमेरिकेतील ताओस, न्यू मॅक्सिको, न्यू जर्सी, इंडोनेशिया, थायलंड, पाकिस्तान, श्रीलंकेसह भारतातील प्रमुख मारुती मंदिरे तसेच समर्थ रामदास स्वामींना स्थापन केलेले ११ मारुती, पुण्याचे प्रसिद्ध मारुती, नगरचे अष्ट मारुती अशा तब्बल ६९३ मारुती मंदिरांच्या माहितीवर आधारीत माहितीपट येथील हरहुन्नरी कलावंत डॉ. अमोल बागुल यांनी तयार केला आहे. मंगळवारी (२१ फेब्रुवारी) या माहितीपटाचे प्रकाशन होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम documentary on 3 6 9 maruti temples around the world
जगभरातील ६९३ मारुती मंदिरांवर माहितीपट

दासनवमी, रामनवमी व हनुमान जयंतीनिमित्त १ तास १५ मिनिटांचा मारुती मंदिरांवरील माहितीपटाची निर्मिती केली गेली आहे. यात विविध भाषेतील आरत्या, स्तोत्रे, कथा, आख्यायिका, हनुमान चालिसा, चित्रपटांतील हनुमान भक्तीगीते आदींसह सोन्या मारुती, काळा मारुती, दुध्या, धक्या, पत्र्या, डुल्या, जिलब्या, चुन्या, उटांडे, निद्रीस्त अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या मारुती मंदिरांची माहितीही यात आहे. प्रकाशनानंतर हा माहितीपट सोशल मिडियावर लिंक स्वरुपात उपलब्ध होणार आहे. याशिवाय या माहितीवर आधारित पुस्तकही तयार करण्याचे नियोजन आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज