अ‍ॅपशहर

डॉ. गोपाळराव मिरीकर कालवश

नगरचे ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ संगीत अभ्यासक डॉ. गोपाळराव रामराव मिरीकर (वय ७८) यांचे मंगळवारी (५ डिसेंबर) दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी गायत्री मिरीकर, मुली उर्मिला इनामदार व अद्वैता शेडगे, बंधू-ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर व अॅड. जी. आर. मिरीकर असा परिवार आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात डॉ. मिरीकर यांच्यावर कर्करोगावरील उपचार सुरू होते.

Maharashtra Times 6 Dec 2017, 6:05 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dr gopal rao mirikar pass away
डॉ. गोपाळराव मिरीकर कालवश

नगरचे ज्येष्ठ पत्रकार व ज्येष्ठ संगीत अभ्यासक डॉ. गोपाळराव रामराव मिरीकर (वय ७८) यांचे मंगळवारी (५ डिसेंबर) दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी गायत्री मिरीकर, मुली उर्मिला इनामदार व अद्वैता शेडगे, बंधू-ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद मिरीकर व अॅड. जी. आर. मिरीकर असा परिवार आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात डॉ. मिरीकर यांच्यावर कर्करोगावरील उपचार सुरू होते.

मूळचे पाथर्डी तालुक्यातील मिरी या गावचे असलेले डॉ. गोपाळराव मिरीकर हे सरदार बाबासाहेब मिरीकरांचे ज्येष्ठ चिरंजीव. सरदार मिरीकरांनी नगरमध्ये रिमांड होम व ऐतिहासिक वस्तु संग्रहालय उभारण्यात पुढाकार घेतला होता. सांगीतिक परंपराही त्यांनी जपली होती. या दोन्ही संस्थांवरील कामासह परिवाराचा सांगीतिक वारसा डॉ. गोपाळराव मिरीकरांनीही आयुष्यभर जपला. दिल्ली आकाशवाणीवर तब्बल २५ वर्षे मराठी वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम केले होते. तेथील निवृत्तीनंतर नगरला विविध वृत्तपत्रांतून त्यांनी अनेकविध विषयांवर विपुल लेखन केले. ते उत्तम राजकीय विश्लेषकही होते. पत्रकारितेत अभ्यासू पिढी निर्माण व्हावी म्हणून येथील हिवाळे शिक्षण संस्थेच्या 'सीएसआरडी' महाविद्यालयात त्यांनी 'मास्टर इन मास रिलेशन्स' (एमएमआर) व 'जर्नालिझम, कम्युनिकेशन अँड पब्लिक रिलेशन्स' (जेसीपीआर) हे दोन अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सुरू केले. या दरम्यान वयाच्या साठीत असताना डॉ. मिरीकरांनी 'लोकसंज्ञापन' विषयावर पीएच. डी. केली. यावरच त्यांनी नंतर लिहिलेले पुस्तक पुणे विद्यापीठाने स्वीकारून पत्रकारिता अभ्यासक्रमात समाविष्ट केले.

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकरांच्या काही कवितांना चाली लावून त्यांचा 'कवितांची गाणी' कार्यक्रम केला होता. वडिलांच्या स्मृतिनिमित्त घरी नामवंत कलावंतांच्या संगीत मैफिलीही त्यांनी घडवल्या. नगर व्यासपीठ संस्थेची स्थापना करून गणेशोत्सवात नगर महोत्सव उपक्रम राबवला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज