अ‍ॅपशहर

पाथर्डीत बारमध्ये मद्यधुंद पोलिसाचा धिंगाणा

बीड जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकानं दारूच्या नशेत पाथर्डीतील एका बारमध्ये काल रात्री गोंधळ घातला. त्याला रोखण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यानं धक्काबुक्की केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 27 Apr 2018, 12:13 pm
अहमदनगर :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम PSI


बीड जिल्ह्यातील एका पोलीस उपनिरीक्षकानं दारूच्या नशेत पाथर्डीतील एका बारमध्ये काल रात्री गोंधळ घातला. त्याला रोखण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यानं धक्काबुक्की केली. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

अमोल मालुसरे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात मालुसरे कार्यरत आहे. तो पाथर्डीतील बारमध्ये गेला होता. तेथे जेवणाचे बिल साडेचार हजार रुपये झाले. बारमालकाने बिल मागितल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाला. मालुसरे याने रिव्हॉल्व्हर काढून धमकावण्यास सुरुवात केली. मालकासह नोकरांनाही मारहाण केली. याची माहिती मिळाल्यानंतर पाथर्डीचे पोलीस घटनास्थळी गेले. तेथे गेलेल्या अधिकाऱ्यालाही त्याने मारहाण केली. या प्रकरणी बारमालकानं पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी मालुसरेला ताब्यात घेतले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज