अ‍ॅपशहर

खडसेंना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; माजी मंत्र्याची टीका

एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. खडसेंना पश्चात्ताप होईल, असं माजी मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

Authored byसंदीप कुलकर्णी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Oct 2020, 7:15 am
अहमदनगर: 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. मात्र खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्येजी किंमत होती, ती कधीही राष्ट्रवादीत मिळणार नाही. आगामी काळात खडसे यांना राष्ट्रवादीत गेल्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही,' असा घणाघात भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Khadse


वाचा: खडसेंचा भाजपला रामराम; शुक्रवारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आज थेट पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात असून हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यातच माजी मंत्री प्रा. शिंदे यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'भाजपमध्ये खडसे यांना जी किंमत होती, ती राष्ट्रवादी त्यांना कधीही मिळणार नाही. खडसे यांच्यासोबत जे लोक जात आहे, अशी जी काही वलगणे सांगितली जात आहेत, पण मला वाटतं त्यांच्यासोबत लोकमतातील कोणताही प्रचलित नेता जाणार नाही. कोणीही एवढे धैर्य दाखवणार नाही. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा विस्तार होताना दिसतोय,म्हणून आता खडसे यांनी राष्ट्रवादीत जाण्याची जी हिंमत केली, त्यांचा आगामी काळात त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.'
वाचा: 'चोरून लग्न तुम्ही करता आणि बापाला संसार चालवायला सांगता?'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज