अ‍ॅपशहर

सप्टेंबरअखेरपर्यंत अकरावीला प्रवेश

दहावीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता यावा, यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Times 13 Sep 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम eleventh admisson till september
सप्टेंबरअखेरपर्यंत अकरावीला प्रवेश

दहावीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश घेता यावा, यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. अकरावी प्रवेशापासून दहावी उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत प्रवेश देण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या फेरपरीक्षेला नगर जिल्ह्यातील ५ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी प्रत्यक्ष ५ हजार ४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून १ हजार ५४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागातून सांगण्यात आले. फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळावा, यासाठी अकरावीच्या रिक्त जागांचा आढावा शिक्षण विभागाने घेण्यास सुरूवात केली आहे. दहावीला उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा जिल्ह्यामध्ये अकरावीच्या जागा जास्त आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. दरम्यान, मार्च २०१७ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी विज्ञान व वाणिज्य शाखेला प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले होते. तर कला शाखेला विद्यार्थी न मिळाल्याने कॉलेजांना गुणवत्ता यादी न लावता विद्यार्थ्यांना प्रवेश दिले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज