अ‍ॅपशहर

बँक विलिनीकरण; कर्मचाऱ्यांची निदर्शने

बडोदा बँक, देना बँक व विजया बँकेच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ या तिन्ही बँकांतील स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी येथे निदर्शने केली.

Maharashtra Times 21 Sep 2018, 1:34 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम employee protest against bank merger decision
बँक विलिनीकरण; कर्मचाऱ्यांची निदर्शने


बडोदा बँक, देना बँक व विजया बँकेच्या विलिनीकरणाच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ या तिन्ही बँकांतील स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी येथे निदर्शने केली. येथील बडोदा बँकेच्या कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनात बँक अधिकारी-कर्मचारी संघटनेचे कांतीलाल वर्मा, सुधीर कुलकर्णी, उमाकांत कुलकर्णी आदी सहभागी झाले होते.

बडोदा, देना व विजया बँकेच्या विलिनीकरणाच्या विरोधात बँक अधिकारी व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने राज्यभरात गुरुवारी निदर्शने आयोजित केली होती. नगरमध्येही अशी निदर्शने करताना केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित द्विपक्षीय कराराकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून दुसरीकडे बँकांचे अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. बँकांच्या एनपीए वसुलीसाठी उपाययोजना न करता व कर्जबुडव्यांवर कारवाई करण्यासाठी बँकांना कायदेशीर अधिकार न देता बँकांच्या वाढत चाललेल्या तोट्याला बँकांनाच जबाबदार धरले जात असल्याचाही दावा करण्यात आला. बँक तोट्याच्या नावाखाली व विलिनीकरणातून बँका सशक्त करण्याचा कांगावा करीत बँकांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला. त्यामुळे हे विलिनीकरण हाणून पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहनही करण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज