अ‍ॅपशहर

कोतूळला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी?

पंधरा वर्षे या गावात महिलाच सरपंच आहे; मात्र, गावातील प्रमुख देवतांपैकी कोतूळच्या मोठादेव मंदिरात प्रवेशद्वारासाठी महिलांना बंदी असून तसा फलक लावण्यात आलेला आहे.

Maharashtra Times 22 May 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम entry prohibited for women in kotul temple
कोतूळला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी?


कोतूळ गावचा इतिहास पाहिला तर यादव राजवट निजामशाही, शिवशाही, पेशवाई या कालखंडातील इतिहासाचे दाखले देणारे किल्ले वजा गढ्या, वाडे इथल्या ऐश्वर्याची प्रतीके आहेत. स्त्री-पुरुष समानतेची गुढी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४१ ला पहिली महिला परिषद घेऊन समतेचा शंख फुंकला.

पंधरा वर्षे या गावात महिलाच सरपंच आहे; मात्र, गावातील प्रमुख देवतांपैकी कोतूळच्या मोठादेव मंदिरात प्रवेशद्वारासाठी महिलांना बंदी असून तसा फलक लावण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील शनि चौथरा प्रवेश प्रकरण देशभरात गाजले. त्याच जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळपासून दीड किमीवर केळी नाचणठाव या जिल्हा मार्गावर परिसरातील आराध्य दैवतांपैकी एक म्हणजे 'मोठादेव बाबा' कोतूळसह परिसरातील लोक बाबांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. मे महिन्यात मोठी यात्राही भरते, यात्रेत किमान पाच दहा हजार लोक येतात. काही वर्षांपूर्वी बाबांचा दैवी संचारही काही जेष्ठांच्या अंगात येत होता. विशेष म्हणजे या देवस्थानचे व्यवस्था पाहणारे कुटुंब गावातील उच्चशिक्षित कुटुंब आहेत. गावातील प्रत्येक नवविवाहित जोडप्याला बाबांच्या दर्शनासाठी जावेच लागते; मात्र, मंदिरावरील महिलांना प्रवेशबंदीचा ' तो ' फलक पाहून आपल्या अर्धांगिनीला मात्र दूरच ठेवावे लागते.

मोठादेव बाबांचा इतिहासही मोठा रंजक सांगितला जातो. महाभारतातील द्रोणाचार्य पुत्र अश्वत्थामा यांची ही समाधी आहे. अश्वत्थामा हा अमर व ब्रह्मचारी असल्याने त्यांना स्त्रियांची सावलीदेखील वर्ज्य आहे, असे देवस्थानची देखभाल करणारी कुटुंब सांगते; मात्र, पाच हजार वर्षांपूर्वी मेरठ (राजस्थान) येथे महाभारतातील युद्धात श्रीकृष्णाने अर्जुनाकरवी अश्वत्थाम्यास मारण्याचे आदेश दिले; मात्र, द्रौपदीला अश्वत्थामा लहान असल्याने दया आली व त्यास न मारता जंगलात सोडून दिले. द्रौपदीच्या मातृत्व भावनेने अश्वत्थाम्यास जीवदान मिळाले. त्याच मंदिरावर स्त्री प्रवेशबंदीचा फलक लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

कोट ः

पूर्वी अंगात संचार येत होते, तसेच कोंबड्या व बकऱ्याचे बळी दिले जायचे ती प्रथा दहा वर्षांपासून बंद आहे; मात्र मोठ्या बाबाची काठी पाडव्याच्या दिवशी निघून तीन महिने एक कुटुंब तिची पूजा करीत असे व नंतर देवाची यात्रा भरते. "मारूती ब्रह्मचारी असल्याने त्या मंदिरात जशा महिला जात नाहीत तसेच मोठादेव अश्वत्थाम्याचे मंदिर असल्याने तेथे महिला जात नाहीत. महिलांना मंदिर व्यवस्थापन मज्जाव करत नाही. त्या स्वतः तो नियम पाळतात. हे तीन पिढ्यांपासून सुरू आहे. श्रद्धा म्हणून महिला जात नाहीत.

- सोमदास पवार, मंदिर व्यवस्थापक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज