अ‍ॅपशहर

पाच जिल्ह्यातील माजी सैनिकांचा नगरला मेळावा

भारतीय सेना व नौदलाच्या माजी सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आर्मड सेंटर व स्कूलमध्ये येत्या रविवारी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Maharashtra Times 11 Nov 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ex army men meet
पाच जिल्ह्यातील माजी सैनिकांचा नगरला मेळावा


भारतीय सेना व नौदलाच्या माजी सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी आर्मड सेंटर व स्कूलमध्ये येत्या रविवारी (१३ नोव्हेंबर) मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी अहमदनगरसह सोलापूर, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मेळाव्याला येणाऱ्या माजी सैनिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, यात सर्जिकल, चिकित्सा, हाडाचे रोग, डोळे, कान, नाक व स्त्रीरोग तपासणी होणार आहे. पेन्शनधारकांसाठी बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिली जाणार आहे. लष्कराची सीएसडी व नॉन सीएसडी कॅन्टीन सुविधा येथे उपलब्ध असणार असून, वेतन लेखा कार्यालयासंबंधीच्या तक्रारींचे निवारणही केले जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी झेरॉक्स मशीन व लिपिकची सुविधाही दिली जाणार आहे. बसस्थानक व रेल्वेस्टेशनपर्यंत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मेळाव्यामध्ये सरकारी योजनांच्यासंबंधी माहिती, शैक्षणिक संस्थांमध्ये असणारे आरक्षण, नोकर भरती प्रक्रिया, लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा रोजगार मिळविण्यासाठी माहिती देणारा विशेष कक्ष येथे असणार आहे. मेळाव्याला येणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर रोड, तारकपूर बस स्थानक, माळीवाडा व स्वस्तिक बसस्थानक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी मदत केंद्र उभारण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज