अ‍ॅपशहर

सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पकडले

फोटो आहेलोगो - क्राइम डायरीसराईत गुन्हेगारांच्या टोळीला पकडले स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच आरोपी अटकेतम टा...

Maharashtra Times 5 Feb 2018, 1:58 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम expert criminal gang arrested
सराईत गुन्हेगारांच्या टोळीला पकडले


दरोड्याच्या तयारीत असलेली पाच सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने बुऱ्हाणनगर रोडवरील व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटसमोर शुक्रवारी मध्यरात्री पकडली. दत्तात्रय पद्माकर माळी (वय २८, रा. गळलिंब, ता. श्रीरामपूर), शाम रामदास जाधव (वय २६, रा. संकरापूर, ता. राहुरी), धनराज सुरेश केदारी (वय २०, रा. राहुरी खुर्द, राहुरी), सचिन हेमंत जाधव (वय २०) व भरत मार्कस जाधव (वय २२, दोघेही रा. पिंपळगाव फुनगी, ता. राहुरी) अशी आरोपींची नावे असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर, या टोळीतील दोनजण अंधाराचा फायदा घेऊन पळाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

शुक्रवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनशाम पाटील, रोहिदास पवार, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या सूचनांप्रमाणे भिंगार परिसरात पोलिस रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत होते. या वेळी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना सराईत गुन्हेगार भरत जाधव व सचिन जाधव हे त्यांच्या साथीदारासह दरोडा घालण्यासाठी बुऱ्हाणनगर रोडवरून जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पवार यांनी बुऱ्हाणनगर रोडवरील व्हिडिओकॉन कंपनीच्या गेटसमोर सापळा रचला. या वेळी तीन मोटारसायकलवरून सात जण बुऱ्हाणनगर बाजूकडून येताना पोलिसांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी मोटारसायकली थांबवण्याचा इशारा करताच, आरोपींनी गाडीचा वेग कमी केला व पोलिसांनी त्यांना घेराव घालून पकडले. या वेळी अंधाराचा फायदा घेऊन विशाल विजय बनसोडे (रा. पिंपळगाव फुनगी, ता. राहुरी) व महेश तुळशीराम मोरे (रा. गळलिंब) हे दोन आरोपी पळून गेले. तर, उर्वरित पाचजणांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून १ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यासर्व आरोपींकडून अद्याप १३ गुन्ह्यांची कबुली मिळाली असून तपास सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज