अ‍ॅपशहर

खंडणी मागणारा तोतया पत्रकार जेरबंद

बेहिशोबी मालमत्तेची माहिती वृत्तवाहिनीवर दाखविण्याची धमकी देऊन व्यापाऱ्याला २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका तोतया पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. एका बड्या वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी मागणाऱ्या या तोतया पत्रकाराचे नाव अजीज बाबू इनामदार असे आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2018, 1:20 pm
नगरः बेहिशोबी मालमत्तेची माहिती वृत्तवाहिनीवर दाखविण्याची धमकी देऊन व्यापाऱ्याला २५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका तोतया पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे. एका बड्या वृत्तवाहिनीचा पत्रकार असल्याची बतावणी करून खंडणी मागणाऱ्या या तोतया पत्रकाराचे नाव अजीज बाबू इनामदार असे आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fake reporter arrested for extortion in ahmednagar
खंडणी मागणारा तोतया पत्रकार जेरबंद


नगरमधील व्यावसायिक लॉरेन्स स्वामी यांच्याकडे इनामदारने २५ लाखांची खंडणी मागितली. तुम्ही अवैध संपत्ती जमविली असून तुमच्या संपत्तीची माहिती वृत्तवाहिनीवर दाखवून ईडीमार्फत चौकशी लावतो, अशी धमकी त्याने स्वामींना फोनद्वारे दिली होती. हे प्रकरण मिटवायचे असेल तर २५ लाख रुपये देण्याची मागणीही त्याने केली. त्यामुळे घाबरलेल्या स्वामी यांनी इतर पत्रकारांकडे इनामदारबाबत चौकशी केली असता तो तोतया पत्रकार असल्याचे समोर आले. त्यानंतर स्वामी यांनी पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली.

सोमवारी रात्री स्वामी यांनी इनामदारला खंडणीची रक्कम घेण्यासाठी हॉटेल ग्रँड दरबार येथे बोलविले होते. या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी इनामदारला खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडले. पोलिसांनी त्याच्याकडून प्रेसची दोन ओळखपत्रे, एक माइक, एक कॅमेरा आदी साहित्य जप्त केले आहे. त्याच्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणात आणखी एका तोतया पत्रकारांचा समावेश असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज