नगर : माळीवाडा बसस्थानकाजवळ नगर-पुणे महामार्ग ओलांडत असताना दुभाजकावर उभा असताना तोल जाऊन ट्रकच्या मागील चाकाखाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीची रात्री उशीरापर्यंत ओळख पटू शकली नाही. मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ४५ ते ५० वर्षांची एक व्यक्ती माळीवाडा बसस्थानकाजवळ महामार्ग ओलांडत होती. दुभाजकावर ही व्यक्ती उभी होती. उसाने भरलेला एक ट्रक पुण्याच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी दुभाजकावर उभ्या असलेल्या व्यक्तीचा तोल जाऊन ती व्यक्ती ट्रकच्या मागील चाकाखाली आली. ट्रकचे मागील चाक त्या व्यक्तीच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक रस्त्याच बंद पडला होता. त्यामुळे काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ट्रक रस्त्याच्या बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरुळीत करण्यात आली.
ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू
माळीवाडा बसस्थानकाजवळ नगर-पुणे महामार्ग ओलांडत असताना दुभाजकावर उभा असताना तोल जाऊन ट्रकच्या मागील चाकाखाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jan 2020, 4:00 am