अ‍ॅपशहर

दूध उत्पादकांना दोन रुपये रिबेट

गुणवत्तेतून राजहंस दूध संघ राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला असून यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये १० पैसे प्रमाणे योग्य त्या कपातीसह रिबेट देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

Maharashtra Times 29 Sep 2016, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers will given 2 rupees rebate
दूध उत्पादकांना दोन रुपये रिबेट


पर्जन्यछायेत व सतत दुष्काळी असलेल्या संगमनेर तालुक्यात दूध व्यवसायाने मोठी आर्थिक स्थिरता निर्माण केली आहे. गरिबांचे जीवनमान उंचावताना गुणवत्तेतून राजहंस दूध संघ राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला असून यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर दोन रुपये १० पैसे प्रमाणे योग्य त्या कपातीसह रिबेट देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत थोरात बोलत होते. रणजितसिंह देशमुख अध्यक्षस्थानी होते. जिल्हा बँकेचे संचालक बाजीराव खेमनर, अ‍ॅड. माधव कानवडे, रामदास वाघ, व्हाइस चेअरमन साहेबराव गडाख, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण कुटे, हरिभाऊ वर्पे, शिवाजी थोरात, मीरा चकोर, रावसाहेब नवले, शंकर खेमनर ,आर. बी. रहाणे, बाबा ओहोळ, केशव मुर्तडक, अमित पंडित, कार्यकारी संचालक प्रताप उबाळे, किरण पा. डोणगावकर, अनिल श्रीखंडे आदी या वेळी उपस्थित होते. या प्रसंगी उत्कृष्ट दूध वितरण व दूध उत्पादन करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला.

आमदार थोरात म्हणाले, दुग्ध व्यवसायात स्पर्धा निर्माण झाली असून स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन संकल्पना राबवून गुणवत्तेत आणखी सुधारणा करावी लागेल. यावर्षीही दूध उत्पादकांना संघाच्या वतीने प्रति लिटर २ रुपये १० पैसे या प्रमाणे रिबेट देण्यात येणार असून ४० पैसे अनामत ठेवून १ रु. ७० पसै प्रमाणे दिवाळीला दूध उत्पादकांना हे रिबेट दिले जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज