अ‍ॅपशहर

सर्जेपुरात फटाक्यांमुळे आग

सर्जेपुरा भागात राधाकृष्ण मंदिरासमोर असणाऱ्या एका इमारतीच्या टेरेसवर ठेवण्यात आलेले फायबरच्या साहित्याने फटाक्यांमुळे पेट घेतला. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.

Maharashtra Times 23 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire crackers cause to sarjepura fire
सर्जेपुरात फटाक्यांमुळे आग


सर्जेपुरा भागात राधाकृष्ण मंदिरासमोर असणाऱ्या एका इमारतीच्या टेरेसवर ठेवण्यात आलेले फायबरच्या साहित्याने फटाक्यांमुळे पेट घेतला. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

सर्जेपुरा भागातील अशोक गुप्ता राहत असलेल्या इमारतीवर फायबरचे भंगार साहित्य ठेवण्यात आले होते. या साहित्याने रविवारी सायंकाळी अचानक पेट घेतला. याबाबत अग्निशमन विभागाला तातडीने माहिती देण्यात आली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या माळीवाडा व सावेडी केंद्रातील प्रत्येक एक गाडी घटनास्थळाकडे रवाना झाली होती. त्यानंतर दहा मिनिटांमध्ये ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. दरम्यान, या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून ही आग फटाक्यांमुळे लागली असू शकते, असे अग्निशमन विभागातून सांगण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज