अ‍ॅपशहर

नगरमध्ये भीषण अपघातात चौघे जागीच ठार

नगर-दौड महामार्गावरील नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले असून यातील तिघे नगरमधील भिंगार व एक जण वाळकी येथील आहे.

महाराष्ट्र टाइम्स 26 Sep 2019, 10:24 am
अहमदनगर: नगर-दौड महामार्गावरील नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जागीच ठार झाले असून यातील तिघे नगरमधील भिंगार व एक जण वाळकी येथील आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम accident


अपघातग्रस्त कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत होती. बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ हा अपघात झाला. भरधाव कार पाठीमागून ट्रकला धडकली. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली. अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली. अपघातात भिंगारचे तिघे जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज