अ‍ॅपशहर

गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात

भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शहरासह उपनगरांमधील गजानन महाराज मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Times 20 Feb 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gajanan maharaj enthusiasm
गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात

भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त शहरासह उपनगरांमधील गजानन महाराज मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
धरमपुरी येथे सालाबादप्रमाणे गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धरमपुरी येथे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सावेडी उपनगरातील नवलेनगर येथील गजानन महाराज मंदिरात महाराजांची पालखी मिरवणूक, महाआरती, असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात आले. महापौर सुरेखा कदम, नगरसेविका उषा नलवडे, लक्ष्मी शिंदे, नगरसेवक स्वप्नील शिंदे, संजय घुले, संपत नलवडे, कुमार नवले, महेश तनपुरे यांच्यासह भाविकांनी या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. गजानन महाराजांची महाआरती मंगलभक्त सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर परिसरातून महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रेणावीकर विद्यालयासमोर असणाऱ्या आदिती अपार्टमेंट येथेही गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंजली दामले यांनी परिश्रम घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज