अ‍ॅपशहर

सरकारी कर्मचाऱ्यांचा मुंबईत निघणार मोर्चा

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी मोर्चा येत्या २२ रोजी मुंबईत काढण्यात येणार आहे. नाशिक येथील संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रात नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईच्या मोर्चाचा इशारा निर्णय घेण्यात आला.

Maharashtra Times 13 Feb 2018, 1:09 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम government employees rally in mumbai
सरकारी कर्मचाऱ्यांचा मुंबईत निघणार मोर्चा

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी मोर्चा येत्या २२ रोजी मुंबईत काढण्यात येणार आहे. नाशिक येथील संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रात नुकत्याच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबईच्या मोर्चाचा इशारा निर्णय घेण्यात आला.

नाशिकच्या राज्य कार्यकारिणी सभेस राज्यातील ३१ जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. नगर येथील अहमदनगर जिल्हा राज्य सरकारी नोकर संयुक्त संघाचे सरचिटणीस रावसाहेब निमसे, अध्यक्ष बी. बी. सिनारे, कार्याध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष विलास पेद्राम, खजिनदार शशिकांत शिर्शीकर आदींसह अन्य उपस्थित होते. सातवा वेतन आयोग लागू करावा, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू केली जावी, पाच दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय ६० करावे, महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षे संगोपन रजा, केंद्राप्रमाणे महागाई भत्ता आदीसह अन्य प्रश्नांवर २२ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाविषयी प्रत्येक जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीमही हाती घेतली जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज