राळेगणसिद्धीमध्ये जल्लोष
नगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या विजयाबद्दल राळेगणसिद्धीत जल्लोष करण्यात आला. माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, गणेश पठारे, रामहारी भोसले, सुभाष गाजरे यांच्यासह काही ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मात्र यासंबंधी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यावर ते नंतर बोलणार असल्याचे सांगण्यात आले.