अ‍ॅपशहर

नगरमध्ये पारा ४१ अंशावर

मार्चचा शेवटचा आठवडा ‘ताप’दायक राहण्याचा वेध शाळेचा अंदाज खरा ठरत आहे. शुक्रवारी नगरमध्ये कमाल तापमान ४१.० अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या १७ वर्षांतील मार्च महिन्यातील हा उच्चांक आहे.

Maharashtra Times 25 Mar 2017, 3:00 am
म.टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम heat in nagar
नगरमध्ये पारा ४१ अंशावर


मार्चचा शेवटचा आठवडा ‘ताप’दायक राहण्याचा वेध शाळेचा अंदाज खरा ठरत आहे. शुक्रवारी नगरमध्ये कमाल तापमान ४१.० अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या १७ वर्षांतील मार्च महिन्यातील हा उच्चांक आहे. ३१ मार्च २००० रोजी नगरमध्ये कमाल तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर मधल्या काळात मार्चमध्ये कधीही पारा ४० च्या वर गेला नव्हता.

या महिन्याचा शेवटचा आठवडा अतिशय तप्त जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्चविली होती. महिनाखेरपर्यंत किमान आणि कमाल तापमानात झालेली वाढ कायम राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारपासून नगरमध्ये सूर्य तळपू लागला आहे. बुधवारी कमाल तापमान ३९ नोंदले गेले, तर गुरुवारी पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. शुक्रवारी पारा ४१ अंशावर पोहोचला. मार्च २००० मध्ये कमाल तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. २०१२ मध्ये ३९.८, २०१४ मध्ये ३९.७, २०१५ मध्ये ३९.५ असे तापमान मार्च महिन्यात नोंदले गेलेले आहे. या तुलनेत यावर्षीचा मार्च महिना अधिक तप्त जाण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. नागरिक दुपारी बाहेर पडण्याचे टाळत आहे. किमान तापमानही १७ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून रात्रीही उकाडा जाणवू लागला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज