अ‍ॅपशहर

गोरक्षणासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

श्रीगोंदा येथे गोरक्षकांवर झालेला प्राणघातक हल्ल्याचा निषेध, नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या कत्तलखान्यांविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Maharashtra Times 15 Aug 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hindu organizations rally
गोरक्षणासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

श्रीगोंदा येथे गोरक्षकांवर झालेला प्राणघातक हल्ल्याचा निषेध, नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या कत्तलखान्यांविरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभागी होऊन कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली.
अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अखिल भारतीय गोसेवा संघ, हिंदू राष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान, बजरंग दल या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कारवाई करा, गोहत्या थांबली पाहिजे, गाय वाचवा, देश वाचवा, असे फलक घेऊन संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर मोर्चाच्या रुपांतर सभेत झाले. गोसेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाषणात गोरक्षकांवर झालेला हल्ला, कत्तलखान्यांबाबत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी देण्यात आले. गेल्या आठवड्यात श्रीगोंदा पोलिस स्टेशनच्या आवारात गोरक्षक शिवशंकर स्वामी आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गोमाफीया अतिक कुरेशी आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केली आहे. याकडे स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केले असून, काष्टी येथील राजकारणी व्यक्ती सदाअण्णा पाचपुते यांनी हे घडवून आणले असून, पाचपुते यांचा अतिक कुरेशी संबंध असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून, पोलिस अधिकारी, पाचपुते व आरोपी कुरेशी या तिघांचे मोबाइल फेोन तपासून सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. नगर शहरात अवैध कत्तलखाने असून, संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी गायींची खरेदी विक्री व वाहतूक होत आहे. परंतु पोलिस कुठेही कारवाई करत नाहीत, उलट याबाबत तक्रार करणाऱ्या प्रमाणिक गोरक्षकांवर गुन्हे दाखल करत असल्याचे आरोप ही करण्यात आला आहे. यावेळी शिवशंकर स्वामी, सागर ढोंबरे, निलिख धंगेकर, गजेंद्र सैंदर, सागर ढोमणे, घनश्याम बोडखे, सागर डांगरे, परेश खराडे, मनोज औसरकर हे उपस्थित होते.

गोरक्षकांना पोलिस संरक्षणाची मागणी

प्राणीरक्षण करणाऱ्या गोरक्षकांना पोलिसांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असून, पुणे येथील शिवशंकर स्वामी, श्रीगोंदा येथील स्वप्नील खेत्रे या गोरक्षकांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या दोघांना तातडीने पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज